By  
on  

पाहा Video : करीना कपूरच्या 'छम्मक छल्लो' गाण्यावर अशी थिरकली ही मराठमोळी अभिनेत्री

बॉलीवुड दीवा करीना कपूरचे असंख्य चाहते आहेत. करीनाचे सिनेमे त्यातील गाणी ही प्रचंड चर्चेत असतात. यापैकीच एक प्रसिद्ध गाणं म्हणजे छम्मक छल्लो. शाहरुख खान आणि करीना कपूर झळकलेल्या 'रा. वन' या सिनेमातील छम्मक छल्लो हे गाणं प्रचंड गाजलं होतं. आजही या गाण्याची जादू कायम आहे. मोकळे केस, लाल रंगाचा हटके पेहराव असा करीनाचा लुक या गाण्यात पाहायला मिळाला होता. याशिवाय या गाण्यातील डान्स स्टेप्सही प्रचंड फेमस झाल्या होत्या. याच गाण्यावर नुकताच ठेका धरलाय एका मराठी अभिनेत्रीने.

ही अभिनेत्री दुसरी तिसरी कुणी नसून मराठी बिग बॉसच्या पहिल्या पर्वाची स्पर्धक सई लोकूर आहे. सोशल मिडीयावर सई ही मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. मग विविध फोटो आणि व्हिडीओ ती सोशल मिडीयावर पोस्ट करत असते. सईला नृत्याची प्रचंड आवड आहे. तिचे विविध डान्स व्हिडीओही तिच्या सोशल मिडीया अकाउंटवर पाहायला मिळतात.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sai Lokur Roy (@sai.lokur)

 

सईने नुकताच एक डान्स व्हिडीओ सोशल मिडीयावर शेयर केला आहे. सईने यावेळी साडी परिधान केली होती. हिरव्या रंगाच्या साडीवर, लाल ब्लाउज, मोकळे केस असा लुक करुन ती या व्हिडीओत थिरकताना दिसत आहे. करीना कपूरच्या प्रसिद्ध छम्मक छल्लो या गाण्यावर सईने ठेका धरला आहे. या गाण्यावर सईच्या हटके अदा पाहायला मिळत आहेत. शिवाय या लुकमधील काही खास फोटोही सईने शेयर केले आहेत. सईच्या फॉलोअर्सनाही हा व्हिडीओ प्रचंड आवडला आहे.

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive