याचवर्षी जानेवारी महिन्यात अभिनेत्री अभिज्ञा भावे लग्नबंधनात अडकली. मेहुल पैसोबत तिने लगीनगाठ बांधली आहे. अभिज्ञाच्या लग्नाचे विविध कार्यक्रम सोशल मिडीयावर चर्चेत राहिले. अभिज्ञाने नुकताच मेहुलचा वाढदिवसही साजरा केला आहे.
मेहुलचा लग्नानंतरचा हा पहिलाच वाढदिवस घरातच खास पद्धतिने साजरा करण्यात आला. या वाढदिवसासाठी अभिज्ञाने छान सजावटही केली होती. मेहुलच्या वाढदिवसाला खास रेनबो केकही मागवण्यात आला होता.
अभिज्ञाने या वाढदिवसाचे फोटो सोशल मिडीयावर शेयर केले आहेत.
या फोटोंमध्ये अभिज्ञाने मेहुलसाठी मागवलेला रेनबो केके लक्षवेधी ठरला आहे. अभिज्ञाने घरातच खास पद्धतिने पतिचा वाढदिवस साजरा केलाय.