By  
on  

पाहा Photos : 'स्वराज्यजननी जिजामाता' मालिकेच्या सेटवर प्रिया मराठेची 'फरारी की सवारी'

 

'स्वराज्यजननी जिजामाता' या मालिकेतून जिजाऊंची शौर्यगाथा प्रेक्षकांना पाहायला मिळत आहेत.  विविध भागांमध्ये जिजामाता आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास मालिकास्वरूपातून अनुभवायला मिळत आहे. या मालिकेत अभिनेत्री प्रिया मराठे देखील महत्त्वाची भूमिका साकारतेय. रायबागनची भूमिका प्रिया साकारतेय. या भूमिकेसाठी घोडेस्वारी, तलवारबाजी या सगळ्या गोष्टी करताना प्रिया दिसतेय.

याच मालिकेच्या सेटवर प्रियाने फरारी की सवारी केली आहे. आता हे ऐकूनच कुणालाही नवल वाटेल. पण फरारी ही चारचाकी नसून घोड्याचं नाव आहे. या मालिकेत विविध सीन्समध्ये घोडेस्वारी करण्यासाठी जो घोडा वापरण्यात आलाय त्याचं नाव फरारी असं आहे. प्रियाने नुकतेच या घोड्यासोबतचे फोटो शेयर केले आहेत.

रायबागनच्या पेहरावात घोड्यावर बसलेली प्रिया या फोटोंमध्ये दिसतेय. प्रिया या पोस्टमध्ये लिहीते की, "फरारी की सवारी.. हिचं नाव फरारी आहे. ती अतिशय मोहक आहे. संयमी, शांत आणि सुंदर."

या फरारीसोबत प्रियाची चांगलीच मैत्री झालेली पाहायला मिळते. या फरारीसोबत चांगली मैत्री झाली म्हटल्यावर सीनही दमदार झाला असेल यात शंका नाही.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive