फिटनेससाठी मनोरंजन विश्वातील कलाकार योगा किंवा वर्कआउट करतात. मात्र सध्या अनेक कलाकारांचा योगाकडे जास्त कल पाहायला मिळतोय. यात मराठीसह हिंदीत लोकप्रिय ठरलेली अभिनेत्री अमृता खानविलकरचं नाव फिटनेसच्या बाबतीत कायम पुढे असतं.
अभिनेत्री अमृता खानविलकरची एक उत्तम अभिनेत्री, नृत्यांगना, स्टाईल आयकॉन अशी विविध ओळख आहे. यासोबतच ती तिचं फिटनेसही कायम जपतेय. मनोरंजन विश्वातील फिट अभिनेत्रींपैकी ती एक आहे. यासाठी कधी वर्कआउट, योगा तर कधी नृत्य या माध्यमातून तिचा कायम फिटनेसकडे कल राहिलाय.
अमृताने नुकतेच तिचे काही फिट फोटो शेयर केले आहेत. सध्या अमृता फिटनेससाठी पुन्हा योगा करताना दिसत आहे. रसिका क्षीरसागर या योगा ट्रेनरकडून ते योगाचं ट्रेनिंग घेत आहे.
अमृताने योगाच्या या नव्या प्रवासातील काही खास फोटो क्लिक केले आहेत. काही योगा पोझमध्ये अमृताने हे फोटोशुट केलय. अमृताने हे फोटो नुकतेच सोशल मिडीयावर शेयर केले आहेत.
"तुम्ही विचार करता त्याहीपेक्षा तुम्ही मजबूत आहात..." हा सकारात्मक विचार अमृताच्या ट्रेनरने सांगीतलाय. जो अमृताने कॅप्शन म्हणून दिला आहे. अमृताने या पोस्टच्या माध्यमातून तिच्या ट्रेनरचे आभार मानले आहेत.