By  
on  

मानसिक, शारीरिक स्वास्थ्यासाठी अमृता खानविलकर सध्या योगाला देतेय प्राधान्य, म्हणते "आम्हालाही नैराश्य, तणाव येतो"

सध्याच्या कोरोना आणि लॉकडाऊनच्या तणावपूर्ण काळात मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य नीट राहण्यासाठी अनेक जण विविध उपाय करत आहेत. यात अनेक जण योगाची निवड करत आहेत. अनेक आजारांवरील रामबाण उपाय म्हणून ठरत असलेला योगाचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. मनोरंजन विश्वातील कलाकारांचाही योगाकडे कल पाहायला मिळतोय. यात कायम फिट म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री अमृता खानविलकरच्या आयुष्यातही योगाचं महत्त्व आहे. सकारात्मक ऊर्जेसाठीही ती योगाची निवड करते.

अमृताने नुकतेच तिचे काही योगा पोझ फोटो शेयर केले आहेत. आजच्या काळात योगा किती महत्वपूर्ण आहे, हे पटवून देत आपल्या फॉलोअर्सना योगा करण्यासाठी ती प्रेरित करतेय. आपल्या या योगाभ्यासाबद्दल अमृता खानविलकर म्हणते,''सध्या आजूबाजूचे वातावरण खूपच भयंकर आहे. त्यामुळे अनेकदा नैराश्यही येते. इतकी वर्षं या क्षेत्रात असल्याने शूटिंगच्या, मीटिंग्सच्या, कार्यक्रमांच्या निमित्ताने अनेकांशी भेटीगाठी होत होत्या. मित्रमैत्रिणींना भेटणं होतं असे आणि अचानक माणसांचं भेटणं बंद झाल्याने, कुठेतरी मेंटल ब्लॉक झाला आहे. कलाकार म्हणून प्रेक्षकांसमोर वावरत असतानाच पडद्यामागे आम्हीही  एक सर्वसामान्य व्यक्ती म्हणून आयुष्य जगत असतो आणि त्यावेळी आम्हालाही  कुठेतरी नैराश्य, तणाव येतोच आणि यातून बाहेर पडण्याचा एकमेव उपाय म्हणजे योगा. मानसिक, शारीरिक स्वास्थ्यासाठी मी सध्या योगाला प्राधान्य देत आहे आणि याचा मला खूपच फायदा होत आहे. त्यामुळेच मी तुम्हालाही हेच सांगेन, की दिवसातला काही वेळ तुम्हीही योगासाठी द्या. या तणावपूर्ण वातावरणात एक सकारात्मक ऊर्जा देणारा हा उपाय आहे.''

Author

Recommended

PeepingMoon Exclusive