By  
on  

गायिका वैशाली माडेचे सूर गुंजणार राजकारणात, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश

मराठीसह बॉलिवुडमध्ये लोकप्रिय ठरलेली गायिका वैशाली माडेच्या गोड आवाजाचे असंख्य चाहते आहेत. वैशालीचे हे सुरेल सूर आता राजकारणात गुंजणार आहेत. कारण वैशालीने नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत वैशालीने पक्षाचं निशाण घड्याळ हाती घेतलं आहे. त्यामुळे आता वैशालीची आता राजकारणात एन्ट्री झाली आहे. या प्रवेशानंतर उपस्थिती राष्ट्रवादीच्या नेत्यांनी वैशालीच स्वागत केलं आहे. 

 

राष्ट्रवादीच्या मुख्यालयात खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत 31 मार्च, 2021 रोजी वैशालीचा राष्ट्रवादी पक्षात प्रवेश होणार होता. मात्र सध्या कोरोना काळात लॉकडाऊन असल्याने हा प्रवेश पुढे ढकलण्यात आला होता. नुकतच वैशालीने अधिकृतपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सदस्यत्व स्विकारले आहे. 

यावेळी वैशाली माडेसह सुप्रिया सुळे, धनंजय मुंडे आणि राष्ट्रवादीचे नेते, पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी अभिनेते विजय पाटकर यांची उपस्थिती देखील पाहायला मिळाली. 

वैशालीने आत्तापर्यंत अनेक मराठी आणि हिंदी चित्रपट, मालिकांसाठी गाणी गायली आहेत. मराठी बिग बॉसच्या दुसऱ्या पर्वात वैशाली स्पर्धक म्हणून दिसली होती. वैशाली ही 2009 मध्ये सारेगमप चॅलेंजची विजेती ठरली होती.

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive