By  
on  

निवेदिता यांची अशोक सराफ यांच्यासाठी खास पोस्ट, "मी मागच्या जन्मी काही चांगलं केलं असेल म्हणून तू पति म्हणून मिळालास"

मराठी सिनेसृष्टीतील अष्टपैलू अभिनेते अशोक सराफ यांना वाढदिवसानिमित्ता अनेक शुभेच्छा मिळत आहेत. मराठी-हिंदी चित्रपट, मालिका, नाटक या माध्यमातून अशोक सराफ यांनी गेली कित्येक वर्षे प्रेक्षकांचं मनोरंजन केलय. याच अशोक सराफ यांच्यावर वाढदिवसानिमित्ताने शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. 

अशोक सराफ यांना मिळालेल्या शुभेच्छांमध्ये सोशल मिडीयावरील एक पोस्ट लक्षवेधी ठरतेय. ही पोस्ट आहे त्यांची पत्नी निवेदिता सराफ यांनी. अशोक सराफ यांच्या वाढदिवसानिमित्ताने निवेदिता यांनी खास पोस्ट केली आहे.

या पोस्टमध्ये निवेदिता म्हणतात की, "वाढदिवसाच्या शुभेच्छा प्रिय अशोक. मी मागच्या जन्मात काहीतर चांगलं केलं असेल ज्यामुळे या जन्मात तू माझा पति म्हणून मिळालाय. तू माझी ताकद, शिक्षक, मित्र, पालक आणि माझं सर्वस्व आहेस. तू एक उत्तम अभिनेता आणि उत्तम माणूस आहेस."

 

निवेदिता या सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात. त्यामुळे अशोक सराफ यांच्या वाढदिवसानिमित्तानेही त्यांनी पोस्ट केली आहे. याशिवाय सोशल मिडीयावर अशोक सराफ यांच्या चाहत्यांनी त्यांना शुभेच्छा देणाऱ्या विविध पोस्ट केल्या आहेत.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive