By  
on  

पाहा Photos : पति कुणालने क्लिक केले अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचे हे सुंदर फोटो

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सोशल मिडीयावर सक्रिय असते. तिचे विविध फोटो आणि व्हिडीओ ती चाहत्यांसाठी शेयर करते. नुकतच सोशल मिडीयाच्या माध्यमातूनच सोनालीने तिच्या लग्नाची बातमी शेयर केली होती. 7 मे रोजी कुणाल बेनोडेकरसोबत लगीनगाठ बांधल्याची गुड न्यूज तिने चाहत्यांना वाढदिवसाच्या निमित्ताने दिली होती. 

सोशल मिडीयावर सोनालीचा मोठा चाहतावर्ग आहे. या चाहत्यांसाठी सोनाली कायम विविध पोस्ट करताना दिसते. सोनालीने नुकतीच केलेली पोस्ट देखील लक्षवेधी ठरतेय. 

सोनालीने नुकतचे तिचे काही खास फोटो शेयर केले आहेत. मुख्य म्हणजे हे फोटो सोनालीचे पति कुणाल बेनोडेकर यांनी क्लिक केले आहेत. 

सोनाली या पोस्टमध्ये लिहीते की, "फोटोग्राफर मिस्टर बेनोडेकर याच्या प्रेमासाठी. धन्यवाद कुणाल कधीतरी असं करण्यासाठी."

या फोटोंमध्ये लांब निळ्या रंगाच्या गाऊनमध्ये सोनाली सुंदर दिसतेय. चाहत्यांनीही या फोटोंवर लाईक्सचा वर्षाव केला आहे.

 

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive