By  
on  

अमृता खानविलकरच्या या योगा फोटोवर होतोय मिम्सचा वर्षाव, 'डॉक्टर स्ट्रेंज' आणि 'निंजा पुतणी' म्हणत तयार केले हे मीम्स

सोशल मिडीयावर कोणतीही गोष्ट व्हायरल व्हायला वेळ लागत नाही. त्यात सेलिब्रिटींविषयी एखादी माहिती असेल किंवा पोस्ट असेल तर सोशल मिडीयावर त्यावर चर्चा सुरु होते. तर कधी त्याविषयी मीम्स बनवले जातात. असच झालय अभिनेत्री अमृता खानविलकरच्या बाबतीत.

 

अमृताला फिटनेसची प्रचंड आवड आहे. स्वत:ला फिट ठेवण्यासाठी अमृता कधी जीम तर कधी योगा करते. अमृताने नुकतच तिचं खास योगा फोटोशुट सोशल मिडीयावर प्रदर्शित केलं आहे. या फोटोंमध्ये कठिण आणि अवघड आसनांचा देखील समावेश आहे. याच फोटोशुटमधील एक फोटो प्रचंड व्हायरल झाला आहे.

 

अमृताच्या या फोटोंचे मीम्स तयार होऊल लागले आहेत. काहींनी 'डॉक्टर स्ट्रेंज' म्हटलय तर काहींनी 'निंजा पुतणी' म्हणत अमृताच्या या फोटोचे मीम्स तयार केले आहेत. 

मात्र या मीम्सना स्पोर्टींगली घेत अमृतानेही या मीम्सवर कमेंट केल्या आहेत. तिलाही हे मीम्स प्रचंड आवडले आहेत. आपल्या फोटोचे असे मीम्स पाहुन अमृता खानविलकरलाही हसू आवरलं नसेल एवढं नक्की.

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive