बॉलिवूडपासून -हॉलिवूडपर्यंत आपल्या अभिनयाचा ठसा उमटविणारी देसी गर्ल प्रियंका चोप्रा आता पुन्हा बॉलिवूडमध्ये नवीन प्रोजेक्ट्समधून पुनरागमन करते आहे. नुकतीच एक बातमी हाती आली आहे की, प्रियंकाने सलमान खान स्टारर ‘भारत’ सिनेमा सोडला आहे. तर दुसरीकडे प्रियंका अंतराळवीर कल्पना चावलाच्या जीवनपटाची शुटींग पुढील महिन्यापासून सुरू करत असल्याचे वृत्त आहे. बॉक्सिंगपटू मेरी कोमच्या जीवनपटावरील सिनेमात तिची व्यक्तिरेखा साकारून प्रियकांनं सर्वांचीच मनं जिंकली, आता कल्पनाच्या जीवनपटासह पुन्हा ती प्रेक्षकांसमोर आपल्या अभिनयाची जादू दाखविण्यासाठी सज्ज झाली आहे.
प्रियंकाने नुकतंच एका लाईव्ह चॅटमध्ये सांगितलं होतं, “मी लवकरच एका हिंदी सिनेमात झळकणार आहे.” प्रिंयकाने या जीवनपटावरील सिनेमाची स्क्रिप्ट वाचली असून तिने सिनेमासाठी होकार दिल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. तसंच या सिनेमाची एका नव्या प्रोडक्शन हाऊसद्वारे निर्मिती करण्यात येणार आहे. या सिनेमाची दिग्दर्शिका प्रिया मिश्रा ही कल्पना चावला या सिनेमाच्या प्रोजेक्टवर गेली 7 वर्षे काम करत असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, एका हॉलिवूड वृत्तपत्राच्या आधारे, प्रियंकांना नुकतंच 18 जुलैला आपल्या 35 व्या वाढदिवशी बॉयफ्रेंड निक जोनससह गुपचुप साखरपुडा उरकला असून आता लवकरच बोहल्यावर चढण्याच्या तयारीत आहे, आणि याच शूटींगला वेळ देऊ शकत नसल्याच्या कारणास्तव सलमान खान स्टारर ‘भारत’ सिनेमा तिने सोडण्याचा निर्णय घेतला. म्हणूनच सोशल मिडीयावर आणि इतरत्र प्रियंका व निकच्या लग्नाची जबरदस्त चर्चा रंगली आहे.