By  
on  

'इंदौरी इश्क' वेबसिरीजमध्ये झळकणार हे लोकप्रिय मराठी कलाकार

गेल्या काही वर्षात ओटीटीचं क्रेझ वाढलय. वेबसिरीज, वेब फिल्म्सना प्रेक्षकांची मोठ्या प्रमाणात पसंती मिळताना दिसत आहे. यात अनेक मराठी कलाकार विविध वेबसिरीजमध्ये आपलं अभिनयकौशल्य दाखवत आहेत. 'इंदौरी इश्क' या नव्या आगामी वेबसिरीजमध्ये युवा प्रेमाची अनोखी कहाणी पाहायला मिळणार आहे. या वेबसिरीजमध्ये काही मराठी कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत.

अभिनेता सुशांत शेलारने नुकतच सोशल मिडीयावर एक पोस्ट शेयर केली आहे. 'इंदौरी इश्क' या सिरीजमध्ये सुशांत झळकणार असल्याचं यात पाहायला मिळतय. या सिरीजमध्ये सुशांत पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. एवढच नाही तर अभिनेता संतोष जुवेकरदेखील या सिरीजमध्ये पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसेल.

सुशांतने सोशल मिडीयावर या सिरीजच्या सेटवरील काही फोटो शेयर केले आहेत. समीत कक्कड दिग्दर्शित या सिरीजमधील या कलाकारांच्या भूमिका आणि काम पाहणं महत्त्वाचं ठरेल. 9 भागांच्या या ड्रामा सिरीजमध्ये रित्विक साहोर आणि वेदिका भंडारी या कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत. येत्या 10 जून पासून ही सिरीज एम एक्स प्लेयरवर प्रदर्शित होणार आहे.

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive