By  
on  

8 वर्षांनी एकत्र दिसणार मुक्ता बर्वे - उमेश कामतची जोडी, मुक्ता - उमेशचं छोट्या पडद्यावर पुनरागमन

अभिनेता उमेश कामत आणि अभिनेत्री मुक्ता बर्वे ही रोमँटिक जोडी लग्न पहावे करून या चित्रपटातून प्रेक्षकांना पाहायला मिळाली होती. या चित्रपटातील या जोडीची केमिस्ट्री प्रेक्षकांना आवडली होती. हीच केमिस्ट्री आता छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. 'अजूनही बरसात आहे' या नव्या मालिकेतून उमेश आणि मुक्ता पुन्हा एकत्र पाहायला मिळणार आहेत.

मराठी नाटक, मालिका आणि चित्रपटातून लक्षवेधी ठरेलेले हे कलाकार जेव्हा एकत्र येतात तेव्हा कमाल करतात. त्यामुळे या नव्या मालिकेतून ही जोडी पुन्हा प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेईल असं चित्र पाहायला मिळतय. नुकताच या मालिकेचा प्रोमो प्रदर्शित करण्यात आला आणि उमेश-मुक्ता यांनी चाहत्यांना हे खास सरप्राईज दिलं आहे. 

'आभाळमाया' पासून ते 'एका लग्नाची तिसरी गोष्ट' पर्यंत विविध मालिकांमधून उमेश कामतने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. विविध अभिनेत्रींसोबतची त्याची केमिस्ट्री देखील पसंत केली गेली. मात्र आता जवळपास सात वर्षांनी उमेश टेलिव्हिजनवर पुनरागमन करतोय. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Mukta Barve (@muktabarve)

 

'घडलय बिघडलय' पासून ते 'रुद्रम' मालिकेपर्यंत मुक्ता बर्वेने देखील विविध मालिकांमधून प्रेक्षकांची मनंं जिंकली आहेत. तेव्हा मुक्ताही तब्बल चार वर्षांनी मालिका विश्वात पुनरागमन करतेय.  'अजूनही बरसात आहे' या मालिकेतून मुक्तासह उमेशही छोट्या पडद्यावर पुन्हा झळकतोय.

चित्रपटातून लक्षवेधी ठरलेली ही जोडी आता पहिल्यांदाच मालिकेतून एकत्र झळकतेय. "प्रेमाला कुठे असते एक्सपायरी डेट" असं म्हणत प्रदर्शित केलेला मालिकेचा प्रोमोही रंजक वाटतोय, तेव्हा या मालिकेत मुक्ता-उमेशची केमिस्ट्री रंगत आणणार एवढं नक्की.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive