महाराष्ट्रात सध्या पाच टप्प्यांमध्ये अनलॉक होत आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रात विविध नियमांसह चित्रीकरणाला परवानगी मिळाली आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून अनेका मालिकांचे चित्रीकरण हे महाराष्ट्राबाहेर होत आहे. त्यामुळ कलाकारांसह तंत्रज्ञ, विशेषकरुन पडद्यामागील कलाकारही आपल्या कुटुंबापासून लांब राहुन काम करत होते. याच पडद्यामागील कलाकारांचं अभिनेते सुनील बर्वे यांनी कौतुक केले आहे.
सहकुटुंब सहपरिवार या मालिकेचे चित्रीकरण महाराष्ट्राबाहरे सिल्वासा येथे करण्यात आलं. त्यामुळे या मालिकेतील कलाकार, तंत्रज्ञ आणि इतर क्रू मेम्बर्स हे कुटुंबापासून लांब राहुन चित्रीकरण करत होते. याच पडद्यामागील कलाकारांसाठी सुनील बर्वे यांनी सोशल मिडीयावर खास पोस्ट केल्या आहेत.
सुनील बर्वे यांनी अशाच तंत्रज्ञ आणि पडद्यामागील कलाकारांसोबत सेल्फि क्लिक करुन त्यांचे फोटो सोशल मिडीयावर शेयर केले आहेत. सुनील बर्वे या पोस्टमध्ये लिहीतात की, "पडद्या मागील काही कलाकार, जे दररोज आमच्या बरोबरीने, नव्हे आमच्या पेक्षा जास्त मेहेनत करत होते. हे ही आपल्या घरा पासून, कुटुंबा पासून लांब आहेत, विना तक्रार पडेल ती कामं करतायत, सर्वांना खूप प्रेम!अजून बरेच आहेत, ते नंतरच्या पोस्ट मधे येतीलंच!!"
या कलाकारांना कोणतीही प्रसिद्धी मिळत नसते मात्र त्यांचं काम ते चोख करत असतात. पडद्यामागील याच कलाकारांमुळे चित्रीकरणाची प्रक्रिया सुरळीत होत असते. तेव्हा या पोस्ट करून त्यांनी या कलाकाराचं कौतुक करत त्यांचे आभार मानले आहेत.