By  
on  

"दाटून आलेलं आभाळ आणि खूप आठवणी" म्हणत श्रेया बुगडेने शेयर केले हे सुंदर फोटो

चला हवा येऊ द्या या विनोदी कार्यक्रमातून अभिनेत्री श्रेया बुगडे प्रेक्षकांची मनं जिंकते. या कार्यक्रमातील तिच्या अभिनयकौशल्याने तिने प्रेक्षकांचं कायम लक्ष वेधून घेतलय. त्यामुळे श्रेयाचा मोठा चाहतावर्ग आहे. सोशल मिडीयावरही श्रेयाचे बरेच चाहते आहेत. या चाहत्यांसाठी श्रेया विविध पोस्ट करताना दिसते.

श्रेयाने नुकतच एका जाहिरातीसाठी शूटींग केलय. यावेळी क्लिक केलेले फोटो तिने सोशल मिडीयावर शेयर केले आहेत. हातात कुल्हडमध्ये चहा पित असताना साडी लुकमधील या फोटोमध्ये श्रेयाचा हटके अंदाज पाहायला मिळतोय.

या पोस्टमध्ये श्रेया लिहीते की, "चहा, पाऊस, मी आणि साहीर ची गाणी ..दाटून आलेलं आभाळ आणि खूप आठवणी.."

एकीकडे राज्यात पाच टप्प्यात अनलॉक होत असताना मुंबईत चित्रीकरणाला परवानगी मिळाली आहे. तेव्हा कलाकारही पुन्हा जोमाने कामासाठी सज्ज झालेले पाहायला मिळत आहेत.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive