हे ट्विट करुन अभिनेता स्वप्निल जोशीने वाढवली चाहत्यांची उत्कंठा

By  
on  

अभिनेता स्वप्निल जोशीचे असंख्य चाहते आहेत. बालकलाकार म्हणून सुरु केलेला अभिनयचा प्रवास सुरु ठेवत स्वप्निल आजही विविध व्यक्तिरेखेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करतो. सध्या स्वप्निलच्या आगामी प्रोजेक्टविषयी त्याच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. मागील वर्षी 'समांतर' ही वेबसिरीज प्रदर्शित झाली होती. लॉकडाऊन दरम्यान प्रदर्शित झालेल्या या वेबसिरीजने घरात बसलेल्या प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. या सिरीजला मोठ्या प्रमाणात पसंती मिळाली. या सिरीजमधून स्वप्निलने ओटीटी विश्वात पदार्पण केलं. 

आता एकीकडे 'समांतर 2' ची उत्सुकता असतानाच स्वप्निलने नुकतच केलेलं ट्विट त्याच्या चाहत्यांचं लक्ष वेधून घेतय. सुरुवातीला स्वप्निलने "ठरलं !" असं ट्विट केलं. हे ट्विट पाहून चाहत्यांना भुवया उचांवल्या असतील यात शका नाही. मात्र स्वप्निलने यानंतर केलेल्या ट्विटने उत्सुकता ताणून धरली आहे. 

 

स्वप्निलने ट्विट केलं की, "उद्या ! मग म्हणू नका सांगितलं नाही!" हे ट्विट पाहिल्यानंतर चाहत्यांनी तर कमेंट्सचा वर्षाव केला. अनेकांनी विविध अंदाज बांधले. काहींना स्वप्निलच्या आगामी प्रोजेक्टची घोषणा वाटली तर काहींनी 'समांतर 2' चा उल्लेख केला. 

 

स्वप्निलच्या या ट्विटवरुन आगामी प्रोजेक्टविषयी घोषणा असण्याची शक्यता नाकारता येत नाही. मग ती 'समांतर 2' ची घोषणा असेल किंवा कोणती यासाठी थोडी वाट पाहावी लागेल असचं चित्र दिसतय. हे ट्विट नेमकं कशाविषयी आहे हे लवकरच कळेल.

Recommended

Loading...
Share