By  
on  

या सिनेमातून किशोरी शहाणे यांनी मराठी सिनेसृष्टीत केली होती एन्ट्री

सौंदर्यवती, नृत्यांगना म्हणून प्रसिद्ध असलेल्या एव्हरग्रीन अभिनेत्री किशोरी शहाणे यांनी 80, 90 च्या दशकात अनेक मराठी सिनेमांमधून लक्ष वेधलं. पण त्यांची मराठी सिनेसृष्टीत एन्ट्री झाली ती 1987 मध्ये. याच सिनेमाची आठवण किशोरी शहाणे यांनी नुकतीच सोशल मिडीयावर शेयर केली आहे.

प्रेम करुया खुल्लम खुल्ला या मराठी सिनेमातून किशोरी शहाणे यांनी मराठी सिनेविश्वात पदार्पण केलं होतं. या पहिल्याच सिनेमात त्यांनी प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं होतं. या सिनेमात लक्ष्मिकांत बेर्डे, अशोक सराफ, रेखा राव या आणि इतर कलाकारांसोबत त्या झळकल्या होत्या. या सिनेमात त्यांची लक्ष्मिकांत बेर्डे यांच्यासोबतची जोडी पाहायला मिळाली होती.

किशोरी शहाणे यांच्या मराठी सिनेसृष्टीतील पदार्पणाला नुकतीच 33 ते 34 वर्षे पूर्ण झाली आहेत. याच निमित्ताने त्यांनी या सिनेमाच्या आठवणींना उजाळा दिला आहे. त्या लिहीतात की, "आजच्याच दिवशी मी मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये पाऊल ठेवलं होतं. सिल्व्हर स्क्रिन.. पहिला सिनेमा."

 

किशोरी यांनी आत्तापर्यंत अनेक मराठी, हिंदी सिनेमांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. त्यांनी नाटकांमध्येही काम केलय. तर मराठी, हिंदी मालिकांमध्येही त्यांनी लक्षवेधी भूमिका साकारल्या आहेत. मराठी बिग बॉसच्या दुसऱ्या पर्वात त्या स्पर्धक म्हणून झळकल्या होत्या. सध्या 'गुम है किसीके प्यार मे' या लोकप्रिय हिंदी मालिकेतून त्या लक्षवेधी भूमिकेत झळकत आहेत.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive