भारताचे महान धावपटू आणि पद्मश्री विजेते मिल्खा सिंग यांनी शुक्रवारी रात्री अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसापासून ते कोरोनाने संक्रमित होते. जवळपास एक महिना त्यांची कोरोनाशी झुंज सुरु होती. त्यांच्या निधनाने देशावर शोककला पसरली आहे.
देशभरातील विविध क्षेत्रातील व्यक्तिंनी मिल्खा सिंग यांना सोशल मिडीयावर श्रद्धांजली वाहिली आहे. मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांची त्यांच्यासोबत भेट झाली होती. त्यामुळे अनेक कलाकारांनीही शोक व्यक्त केलं आहे.
अभिनेता मिलिंद सोमणचीही मिल्खा सिंग यांच्यासोबत भेट घडून आली होती. आणि त्याच दिवसाची आठवण त्याने शेयर केली आहे.
मिलिंद लिहीतो की, "तुमची इच्छाशक्ती आणि हेतू कायम पिढ्यांसाठी प्रेरणा देत राहील. मी धन्य आहे की मला तुमच्यासोबत काही क्षण घालवण्याची संधी मिलाली. तुमचे मेहनतीसाठीचे शब्द, सकारात्मकता आणि समर्पण हे माझ्या हदयावर कोरले आहे. मिल्खा सिंग, आपल्या राष्ट्राचा प्रकाश."
मिल्खा सिंग यांच्या संघर्षाची कहाणी अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. याच महान धावपटूला सोशल मिडीयाच्या माध्यमातून आदरांजली वाहण्यात आलीय.