By  
on  

चविष्ट पदार्थांसह अनुभवता येणार सुरेल गाण्यांची मैफल, 'गारवा' फेम मिलिंद इंगळे आता दिसणार या भूमिकेत

आपल्या सुरेल गाण्यांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारे सुप्रसिद्ध गायक मिलिंद इंगळे आता प्रेक्षकांना वेगळ्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. असंख्य श्रोत्यांना त्यांनी त्यांच्या गाण्यांमधून वेड लावलं आणि आता चविष्ट पदार्थांनी ते खवय्यांच्या जिभेला तृप्त करणार आहेत.  “गवय्या ते खवय्या” या नव्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपली पाककला ते सादर करणार आहेत. मिलिंद इंगळे हे उत्तम कूक आहेत हे कमी लोकांना माहिती आहेत. त्यामुळे त्यांची पाककला आता पाहायला मिळणार आहे.

वेगवेगळ्या पाककृती ते आपल्या फेसबुक, इन्स्टाग्राम, युट्यूब चॅनलद्वारे सादर करणार आहेत. आपल्या गाण्यांनी लाखो लोकांच्या मनात प्रेमाचे स्थान पटकावलेला हा गायक आता आपल्या पाककृतींनी देखील तसंच प्रेम मिळवण्यासाठी सज्ज आहे. येत्या 1 जुलै पासून मिलिंद इंगळेंच्या युट्यूब चॅनलवरुन आणि त्यांचा सोशल मिडियाच्या माध्यमातून खवय्यांना विविध रेसिपींची चव चाखायला मिळणार आहे. 

‘गवय्या ते खवय्या’ हा फक्त पाककृती कार्यक्रम नसून यामध्ये मिलिंद इंगळे पाककृती दाखविण्यासोबतच वेगवेगळी गाणी देखील ऐकवणार आहेत. त्या गाण्यांमागचे किस्से ऐकवणार आहेत. तर कधी एखाद्या  भागामध्ये एखादा सेलिब्रिटी येऊन त्यांचा आवडता पदार्थ तयार करुन दाखवेल. रसिक प्रेक्षकांना, चाहत्यांना देखील त्यांच्या स्पेशल पाककृती करुन दाखविण्यासाठी निमंत्रित केले जाईल. वेगवेगळ्या स्पर्धेच्या माध्यमातून प्रेक्षकांसोबतदेखील हा कार्यक्रम सादर केला जाणार आहे.    

1998 मध्ये मिलिंद इंगळेंच्या 'गारवा' या गाण्याने अवघ्या महाराष्ट्राला मंत्रमुग्ध केले होते. त्याचवेळी त्यांचं ‘छुई मुई सी तुम लगती हो’ हे गाणं तर त्या वर्षीचं ब्लॉकब्लस्टर ठरलं होतं. 'तुझ्या टपोऱ्या डोळ्यात माझं इवलंसं गाव', गारवा, 'सांज गारवा', 'ये है प्रेम आदी' त्यांचे अल्बम संगीत क्षेत्रात मैलाचा दगड ठरली आहेत. 
 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive