अभिनेत्री तेजस्विनी पंडितच्या सोशल मिडीया पोस्टमध्ये एक व्यक्ति अनेकदा दिसते. तिच्या आयुष्यातील ही खास व्यक्ति म्हणजे तिचा जवळचा मित्र धैर्य आहे. दोघांची अनेक वर्षांपासूनची मैत्री आहे. दोघांनी एकत्र कामही केलय. मात्र तेजस्विनीच्या सुख - दु:खात सहभागी असणारा धैर्य तिच्या आयुष्यातील खास मित्र आहे.
धैर्य घोलप हा मराठी आणि हिंदी चित्रपटात अभिनेता म्हणून काम करतो. तान्हाजी या हिंदी सिनेमातील त्याची भूमिका लक्षवेधी ठरली होती. आज धैर्यच्या वाढदिवसानिमित्ताने त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. या शुभेच्छांमध्ये एक नाव महत्त्वाचं आहे ते म्हणजे तेजस्विनी पंडितचं.
आपल्या खास मित्राला तेजस्विनीने सोशल मिडीया पोस्ट करून शुभेच्छा दिल्या आहेत. तेजस्विनीने धैर्यसोबतचे फोटो शेयर करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.
ती लिहीते की, "माझ्या आयुष्यातील पात्र असलेला एकमेव ड्रामाला. बेफ़िक्र आदमी, इश्क सच्चा, ख़्वाब हज़ारों और दिल बच्चा. वाढदिवसाच्या शुभेच्छा" असं म्हणत तिने धैर्यसोबतचे खास फोटो शेयर केले आहेत.