'अप्सरा आली' फेम सोनाली कुलकर्णी आणि नृत्यदिग्दर्शिक फुलवा खामकर यांची मैत्री अनेक वर्षांपासूनची आहे. अप्सरा आली या लोकप्रिय गाण्यातील सोनालीला प्रेक्षकांची पसंती मिळाली. मात्र या गाण्यांच दिग्दर्शन फुलवा खामकरने केलं होतं. तेव्हापासून या दोघींची खास मैत्री आहे. उत्तम नृत्यांगना असलेल्या सोनाली आणि फुलवाचा एक डान्स व्हिडीओ सध्या चर्चेत आलाय.
हा व्हिडीओ त्यांनी सोशल मिडीयावर शेयर केलाय. याचं कारणही महत्त्वाचं आहे. 10 वर्षांची मैत्री सेलिब्रेट करणारा हा डान्स व्हिडीओ असल्याचं सोनाली तिच्या पोस्टमध्ये म्हणतेय.
'आईये मेहरबान' या गाण्यावर कोणतीही तयारी न करता उत्स्फुर्तपणे या दोघींनी डान्स केलाय. फुलवाच्या डान्स स्टुडिओत दोघींची भेट झाली आणि त्या भेटीचं रुपांतर नंतर या सुंदर डान्स व्हिडीओत करण्यात आलं. सोशल मिडीयावर दोघींचा हा डान्स व्हिडीओ पसंत केला जातोय.
सोनाली या पोस्टमध्ये लिहीते की, "10 वर्षांची मैत्री साजरी करतोय. प्रेम, आदर आणि विश्वास आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकमेकांसोबत कायम उभे आहोत. वाईट आणि चांगल, आनंद आणि दु:खात."
फुलवा खामकरचे विविध व्हिडीओ सोशल मिडीयावर पाहायला मिळतात. विशेषकरून अभिनेत्री उर्मिला कोठारेसोबतच्या फुलवाच्या डान्स व्हिडीओंना पसंती मिळत असते. उर्मिला ही देखील फुलवाची खास मैत्रीण आहे. याशिवाय आता सोनालीसोबतच्या डान्स व्हिडीओला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतोय.
मात्र कोणतीही तयारी न करता अचानक कोरिओग्राफ केलेला सोनाली आणि फुलवाचा हा डान्सा व्हिडीओ लक्षवेधी ठरतोय.