By  
on  

पाहा Video : "राजू सापते यांच्या परिवाराला न्याय मिळाला पाहिजे", निवेदिता सराफ यांची कळकळीची विनंती

लेबर युनियन पदाधिकाऱ्याच्या जाचाला कंटाळून प्रसिद्ध कला दिग्दर्शक राजू सापते यांनी काही दिवसांपूर्वी पुण्यातील घरी आत्महत्या करुन आपलं जीवन संपवलं. या प्रकरणानंतर मराठी मनोरंजन विश्वातून संतापजनक प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. लेबर युनियनच्या पदाधिकाऱ्याचा मुजोरीपणावर संताप व्यक्त होत आहे. अनेकांनी राजू उर्फ राजेश सापते यांना श्रद्धांजली वाहिली असून त्यांना न्याय मिळण्याची मागणी केली आहे. प्रसिद्ध अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी देखील राजू सापते यांच्या न्यायासाठी मागणी केली आहे. निवेदिता यांनी सोशल मिडीयावर एक व्हिडीओ पोस्ट करून या प्रकरणाचा शोध घेण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. त्या पोस्टमध्ये लिहीतात की, "भावपूर्ण श्रद्धांजली, अतिशय गुणी आणि सज्जन कलादिग्दर्शक राजू साप्ते यांच्या परिवाराला न्याय मिळाला पाहिजे"

'अग्गंबाई सूनबाई' या मालिकेसाठी राजू यांनी कला दिग्दर्शन केलं होतं. याच निमित्ताने निवेदिता या राजू यांच्या संपर्कात आल्या होत्या. त्या म्हणतात की, "आज हा व्हिडीओ करताना मला अतिशय दु:ख होतय. आमचे कला दिग्दर्शक राजू सापते यांनी आत्महत्या केली. कोणत्याही समस्येवर आत्महत्या हा उपाय असूच शकत नाही. इतक्या टॅलेंटेड, मनमिळावू, मितभाषी माणसाला असं पाऊल का उचवावं लागलं ?

 

त्या पुढे म्हणतात की, "अग्गंबाई सूनबाई सिरीयलच्या निमित्ताने मी त्यांच्या संपर्कात आले. अतिशय टॅलेंटेड माणूस. अशरक्षह: तीन ते चार दिवसांत त्यांनी अख्खा सेट उभा केला. महाराष्ट्राबाहेर जेव्हा आम्हाला शूटींग करावं लागलं. तेव्हा असेल त्या साधनांमध्ये त्यात त्यांनी रिसॉर्टचं घर बनवून दिलं. त्यांच्यासोबत जी टीम काम करते ती गेली पाच वर्षे त्यांच्यासोबत काम करतेय. ते सगळे कामगार नेहमी सांगतात की ते अतिशय दिलदार होते आणि कुणाचही पेयमेंट अडवलं नव्हतं. मग त्यांच्यावरती असे आरोप का केले गेले. खरच या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन त्याचा शोध घेतला पाहिजे."

राजू सापते यांच्या परिवाराला न्याय मिळण्यासाठी कळकळीची विनंती निवेदिता सराफ यांनी केली आहे. "आज त्यांचा परिवार पोरका झालाय. माझी कळकळीची विनंती आहे सगळ्या संबंधीतांना, माननीय मुख्यमंत्री, राजसाहेब ठाकरे, अमेय खोपकर यांना, की या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन ही कीड लागलीय ती उखडून टाकली पाहिजे. त्यांना न्याय नक्कीच मिळाला पाहिजे.

राजू सापते यांची आत्महत्या ही मनाला चटका लावून जाणारी आहे. त्यांच्या निधनानं मराठी मनोरंजन विश्वात शोककळा पसरली आहे. निवेदिता यांच्यासह मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांनी राजू सापते प्रकरणात त्यांना न्याय मिळावा यासाठी मागणी केली आहे. राजू सापते यांनी आत्महत्येपूर्वी एक व्हिडीओ शेयर केला होता. ज्यात त्यांनी आत्महत्येचं कारण सांगत लेबर युनियन पदाधिकारी राकेश मौर्य याला जबाबदार ठरवलं आहे. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive