पाहा Photos : 'सैराट' फेम रिंकूने आता स्वत:ला केलं इतकं फिट, पाहा रिंकूचा फिट लुक

By  
on  

'सैराट' फेम रिंकू राजगुरुचा आता सोशल मिडीयावर मोठा चाहतावर्ग निर्माण झाला आहे. मुख्य म्हणजे तिच्या इन्स्टाग्राम सोशल मिडीया अधिकृत अकाउंटवर रिंकू तिचे विविध फोटो आणि व्हिडीओ शेयर करते. रिंकू सध्या तिच्या फिटनेसकडे विशेष लक्ष देत आहे. त्यामुळे तिचे फिट लुक फोटोही पाहायला मिळतात. 

रिंकूने नुकतेच काही फोटो सोशल मिडीयावर शेयर केले आहेत. या फोटोंना हजारो लाईक्स मिळताना दिसत आहेत. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे रिंकूचा फिट लुक.

या फोटोंमध्ये रिंकू अतिशय फिट दिसतेय. स्पोर्ट्स आउटफिट आणि शॉर्ट हेयर लुकमध्ये रिंकूचा हटके अंदाज पाहायला मिळतोय. तेव्हा आगामी काळात रिंकू अशा फिट लुकमध्ये स्क्रिनवर झळकेल यात शंका नाही.

रिंकू लवकरच तिच्या आगामी प्रोजेक्टसह प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'आठवा रंग प्रेमाचा', 'छूमंतर' या चित्रपटांमधून रिंकूच्या विविध भूमिका पाहायला मिळणार आहेत.

Recommended

Loading...
Share