By  
on  

पाहा Video : रणवीर सिंहच्या वाढदिवसानिमित्ताने या चाहतीने शेयर केली रणवीरसोबतची ती आठवण..

रणवीर सिंहच्या अभिनयाचे असंख्य चाहते आहेत. फक्त अभिनयच नाही तर त्याची स्टाईल, त्याचं वागणं याविषयीही अनेकांना कुतुहल वाटतं. मात्र माणूस म्हणूनही रणवीर अनेकांचं लक्ष वेधतो. 'चला हवा येऊ द्या' या मराठी विनोदी कार्यक्रमात रणवीरने काही वर्षांपूर्वी हजेरी लावली होती. सिम्बा या त्याच्या सिनेमाच्या प्रमोशनसाठी रणवीर सिंहसह संपूर्ण टीम या कार्यक्रमात हजर होती. मात्र बॉलीवुड स्टार असल्याचा कोणताही आव न आणता रणवीर हा कार्यक्रमाची मजा लुटली होती. एवढच नाही तर 'चला हवा येऊ द्या' च्या मंजावर रणवीरचा खास अंदाज पाहायला मिळाला होता.

आज रणवीरच्या वाढदिवसानिमित्ताने त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. यातच 'चला हवा येऊ द्या' मंचावरील ती आठवण रणवीरच्या एका चाहतीने सोशल मिडीयावर शेयर केली आहे. ही चाहती दुसरी तिसरी कुणी नसून याच कार्यक्रमातील कॉमेडी क्वीन म्हणून ओळखली जाणारी श्रेया बुगडे आहे. अभिनेत्री श्रेया बुगडेसोबत रणवीरने मंचावर धमाल केली होती. आणि हीच आठवण श्रेयाने त्याच्या वाढदिवसानिमित्ताने शेयर केली आहे. 

 

श्रेया ही रणवीरची चाहती असून तिने रणवीरसोबतच्या या आठवणींचे क्षण सोशल मिडीयावर पोस्ट केले आहेत. ती लिहीते की, "मला माहिती आहे की तू कदाचित ही पोस्ट नाही पाहू शकणार, पण तरीही हे सुंदर क्षण मला माझ्या इन्स्टाग्रामवर माझ्या ह्रदयात जसे आहेत तसे कायम ठेवायचे आहेत. धन्यवाद असं अविश्वसनीय असण्यासाठी, वाढदिवसाच्या शुभेच्छा"

अशा खास अंदाजात श्रेयाने रणवीरला शुभेच्छा दिल्या आहेत. श्रेयासह अनेक मराठी कलाकार रणवीरचे चाहते आहेत. रणवीर हा एक उत्तम अभिनेता असून तो एक चांगला माणूस असल्याचाही अनुभव अनेक कलाकारांना आलाय. म्हणूनच कलाकार म्हणून इतर कलाकार त्याच्यावर प्रेम करतात आणि त्याचा आदर करतात एवढं नक्की. 

Recommended

PeepingMoon Exclusive