By  
on  

आषाढी एकादशी निमित्ताने अभिनेत्री अमृता खानविलकर विठ्ठलाच्या चरणी समर्पित करणार नृृत्याविष्कार

नृत्य आणि अभिनेत्री अमृता खानविलकरचा फार जवळचा संबंध आहे. अभिनेत्रीसह एक उत्तम नृत्यांगना अशी अमृता खानविलकरची ओळख आहे. नृत्याविषयी असलेली आवड आणि प्रेम यासाठी अमृत कलाच्या माध्यमातून अमृता विविध नृत्याविष्कार तिच्या चाहत्यांसाठी घेऊन येतेय. यात तिला प्रसिद्ध लोकप्रिय नृत्यदिग्दर्शक आशिष पाटीलची साथ आहे. 

 

लवकरच आषाढी एकादशीच्या निमित्तानेही अमृता खास नृत्याविष्कार सादर करणार आहे. "अवघा रंग एक झाला। रंगि रंगला श्रीरंग ।। " म्हणत विठू माऊलीपर्यंत पोहोचण्याचा आणि त्याच्याशी एकरूप होण्याचा एकमेव मार्ग म्हणजे नादोपासना म्हणजेच नादाची उपासना. अनेकदा आपण आपली कला आणि प्रतिभा ईश्वरचरणी समर्पित करतो. अशाप्रकारे आषाढी एकादशीच्या निमित्ताने अभिनेत्री अमृता खानविलकर ही नृत्यदिग्दर्शक आशिष पाटील यांच्यासह आपला नृत्याविष्कार विठ्ठलाच्या चरणकमली समर्पित करतेय.

 

या नृत्याविष्काराची छोटीशी झलक अमृताने सोशल मिडीयावर शेयर केली आहे. तेव्हा अमृता आणि आशिषचा हा परफॉर्मन्स पाहणं औत्सुक्याचं ठरेल. विविध डान्स रिएलिटी कार्यक्रमाच्या माध्यमातून अमृता स्पर्धक, परिक्षक, सुत्रसंचालक म्हणून दिसली आहे. 'अमृत कला'च्या माध्यमातून अमृताचं नृत्यकौशल्य पाहायला मिळतय.

Recommended

PeepingMoon Exclusive