By  
on  

या कारणासाठी एकत्र येणार टेलिव्हिजनवरील हे दोन लोकप्रिय कलाकार

'चला हवा येऊ द्या' आणि 'फू बाई फू' या कार्यक्रमांमधून लोकप्रिय ठरलेले अभिनेते भाऊ कदम हे विनोदी कलाकार म्हणून प्रसिद्ध आहेत. चला हवा येऊ द्या च्या मंचावरील त्यांचे विविध परफॉर्मन्स पाहणं हे प्रेक्षकांसाठी पर्वणीच असते. भाऊ आता लवकरच आगामी सिनेमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहेत. डाव असं या सिनेमाचं नाव असून नुकतीच या सिनेमाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. 

मात्र या सिनेमात भाऊसोबत झळकणारा अभिनेताही लोकप्रिय आहे. 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेतून राणा दा म्हणून चर्चेत आलेला अभिनेता हार्दिक जोशी या सिनेमात भाऊसोबत झळकणार आहे. हार्दिकने नुकतच सोशल मिडीया पोस्टच्या माध्यमातून त्याच्या चाहत्यांना याविषयी माहिती दिली आहे. 

हार्दिकसाठी भाऊसोबत काम करण ही स्वप्नपूर्ती आहे. अनेक कलाकारांसाठी प्रेरणा असणारे भाऊ हार्दिकसाठीही प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व आहेत. म्हणून खास पोस्टमधून हार्दिक हा आनंद व्यक्त केला आहे. 

 

हार्दिक या पोस्टमध्ये लिहीतो की, "यांच्यासारख्या कलाकार रत्नांपैकी एक कलाकारासोबत काम करणं म्हणजे मी धन्य झालोय. जे माझ्यासाठी कायम प्रेरणा देणारे आहेत. त्यांच्यासोबत काम करण्याची माझी इच्छा पूर्ण होतेय. एका नव्या प्रोजेक्टसह लवकर भेटीला येत आहोत, 'डाव' या सिनेमात या जबरदस्त कलाकारासोबत."

तेव्हा टेलिव्हिजनवरील हे दोन लोकप्रिय कलाकार एकत्र आल्यावर कमाल करणार एवढं नक्की. या दोन कलाकारांना एकत्र पाहणं प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरेल. तेव्हा भाऊ कदम आणि हार्दिक जोशीच्या चाहत्यांसाठी ही गुड न्यूज आहे असं म्हणणं वावगं ठरणार नाही. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive