By  
on  

सई आणि वैभव ‘पॉंडिचेरी’त पहिल्यांदाच एकत्र ; काय चाललंय नेमकं

मराठीतील दोन आघाडीचे सेलिब्रिटी म्हणजे सई ताम्हणकर आणि वैभव तत्ववादी यांच्यात नेमकं काय चालंलय असा प्रश्न तुम्हाला पडलाच असेल. पण असं काही नाही, हे दोघेही प्रथमच सिनेमात एकत्र झळकणार आहेत. सचिन कुंडलकर दिग्दर्शित ‘पॉंडिचेरी’ या आगामी सिनेमात ही जोडी पाहायला मिळणार आहे. सिनेमाचे शुटींग लवकरच सुरु होणार असून पॉंडिचेरीत चित्रिकरण होणार असल्याचा नावावरुन अंदाज व्यक्त होत आहे.

वैभवने ‘पॉंडिचेरी’ सिनेमाबाबतची माहिती आपल्या सोशल नेटवर्किंग साईटवरुन दिली आहे. या सिनेमाचे लेखन सचिन कुंडलकर आणि तेजस मोडक यांनी केले आहे.

सई ताम्हणकरने यापूर्वी सचिन कुंडलकरसोबत 'वजनदार' या सिनेमात काम केले होते. वैभव मात्र पहिल्यांदाच सचिन कुंडलकरसोबत काम करणार आहे. तसेच सई आणि वैभव ही जोडी ऑन स्क्रिन कशी दिसेल आणि त्यांची केमिस्ट्री किती जुळून येईल हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

‘हॅप्पी जर्नी’, ‘गंध’, ‘वजनदार’ असे हटके सिनेमे देणा-या सचिन कुंडलकरांच्या या नव्या सिनेमाची कथा अद्याप गुलदस्त्यात असली तरी कोणतातरी नवा विषय ते हाताळत असणार हे, मात्र नक्की!

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive