By  
on  

हिना पांचाळची कारागृहातून सुटका ? इगतपुरी रेव्ह पार्टी प्रकरणात झाली होती अटक

काही दिवसांपूर्वी इगतपुरी येथे सुरु असलेल्या रेव्ह पार्टीवर नाशिक ग्रामीण पोलिसांनी छापा टाकला होता. त्यावेळी एकूण 22 संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. यात काही मराठी आणि दाक्षिणात्य अभिनेत्रींना अटक करण्यात आली होती. या अटक करण्यात आलेल्या अभिनेत्रींमध्ये मराठी बिग बॉससाठी लोकप्रिय असलेली अभिनेत्री हिना पांचाळचं नावही समोर आलं होतं. या प्रकरणात हिनासह एकूण 25 संशयितांना जिल्हा व सत्र न्यायालयात पोलिसांनी हजर केल्यानंतर न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली होती.

मात्र नुकत्याच समोर आलेल्या हिना पांचाळच्या पोस्टमुले हिनाची सुटका झाल्याचं पाहायला मिळतय. या पोस्टमधून हिनाची कारागृहातून सुटका झाल्याचं दिसतय. हिनाने या पोस्टमध्ये लिहीलय की, "तुमचं प्रेम आणि समर्थनासाठी धन्यवाद, मी परत आली आहे."

ही पोस्ट पाहुन हिनाच्या चाहत्यांनी तिचं स्वागत केलय. सोशल मिडीयावर विविध पोस्ट करून ती परत आल्याचा आनंद व्यक्त केला आहे. मात्र असं असलं तरी हिनाची या प्रकरणातून सुटक झाली आहे का ? या प्रकरणात ती दोषी नसल्याचं सिद्ध झालय का ? या प्रश्नांची उत्तर अद्याप समोर आलेली नाहीत.

नाशिक ग्रामीण पोलिसांनी इगतपुरीत केलेल्या त्या कारवाईत बॉलिवुड, टीव्ही कलाकार अशा एकूण 22 तरुण-तरुणींकडून अंमली पदार्थाचे सेवन केल्याचे आढळले होते. 

हिना पांचाळने आत्तापर्यंत काही मराठी सिनेमांमध्ये काम केलय. हिना ही उत्तम नृत्यांगना असल्याने तिने अनेक मराठी आयटम साँगही केले आहेत. मराठी बिग बॉसच्या दुसऱ्या सिझनमध्ये हिना वाईल्ड कार्ड एन्ट्री स्पर्धक म्हणून दिसली होती. त्यानंतर हिना प्रचंड लोकप्रिय झाली होती. हिनाने काही हिंदी रिएलिटी कार्यक्रमातही सहभाग घेतला होता. हिना ही हुबेहुब मलायका अरोरासारखी दिसणारी अभिनेत्री म्हणूनही प्रसिद्ध आहे. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive