पाहा Video : या कपलने फॉलो केला हा नवा ट्रेंड, "कहानी हर घर की" म्हणत शेयर केला व्हिडीओ

By  
on  

मनोरंजन विश्वात काम करत असताना अनेक कलाकारांच्या रियल लाईफ जोड्या बनल्या आहेत. अशीच एक जोडी म्हणजे अभिनेत्री ईशा केसकर आणि ऋषी सक्सेना ही जोडी. गेल्या काही वर्षांपासून हे कपल एकमेकांना डेट करतय. 

ऋषी आणि ईशाचे काही फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मिडीयावर चर्चेत असतात. असाच एक व्हिडीओ नुकताच ऋषीने शेयर केलाय. सोशल मिडीयावर नवनवीन ट्रेंड येत असतात. यातच आता एका नवा ट्रेंड सोशल मिडीयावर सुरु आहे. हाच ट्रेंड ऋषी आणि ईशाने फॉलो केलाय. नुकत्याच शेयर केलेल्या व्हिडीओत त्यांनी हा ट्रेंड फॉलो केलाय. 

सोशल मिडीयावर या कपलच्या व्हिडीओवर लाईक्सचा वर्षाव झालाय. 

 

ऋषी आणि ईशाने एकत्र काम केलं नसलं तर अनेक पुरस्कार सोहळ्यात, कार्यक्रमांमध्ये त्यांची भेट झाली होती. या भेटींचं रुपांतर मैत्रीत आणि मग पुढे प्रेमात झालं. चला हवा येऊ द्या या कार्यक्रमात ऋषी आणि ईशाने पहिल्यांदाच एकमेकांना पाहिलं होतं. त्यानंतर एका पुरस्कार सोहळ्यात दोघं पहिल्यांदाच एकत्र बोलले होते. ऋषीच्या शांत आणि निरागस स्वभावाने ईशाचं मन जिंकलं होतं. त्यानंतर ईशानेच स्वत: ऋषीला कॉफीसाठी भेट घेण्यासाठी विचारलं होतं. या मेड फॉर इच अदर वाटणारं हे कपल सोशल मिडीयावर कायम चर्चेत असतं. तेव्हा ऋषी आणि ईशा लगीनगाठ कधी बांधणार याविषयी त्यांनी कोणताच खुलासा अद्याप केलेला नाही.

Recommended

Loading...
Share