पाहा Video : कुणीतरी येणार गं ! स्मिता तांबेच्या घरी रंगला डोहाळे जेवणाचा कार्यक्रम

By  
on  

अभिनेत्री स्मिता तांबेविषयी खास गुड न्यूज नुकतीच सगळ्यांना मिळालीय. ही गुड न्यूज तिच्या जवळच्या मैत्रिणींनी समोर आणलीय. स्मिताच्या मैत्रिणींनी एक खास व्हिडीओ सोशल मिडीयावर शेयर केला आणि स्मितावर आता शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

ही गुड न्यूज आहे स्मिता तांबेच्या प्रेग्नेसीची. स्मिताची खास मैत्रीण अभिनेत्री आदिती सारंगधरने सोशल मिडीयावर एक व्हिडीओ शेयर केलाय. हा व्हिडीओ आहे स्मिताच्या डोहाळे जेवणाचा. स्मिताच्या डोहाळे जेवण्याच्या कार्यक्रमात आदितीसह अभिनेत्री रेशम टिपणीस, अमृता संत, फुलवा खामकर या मैत्रिणी सहभागी झाल्या होत्या.

 

यावेळी स्मिताच्या या मैत्रिणींनी मिळून स्मिताला फुलांच्या दागिन्यांनी सजवलय. यावेळी स्मिताचं सुंदर रुप पाहायला मिळालं. मग या मैत्रिणींनी मिळून गाणी म्हटली आणि डान्सही केला. 'कुणीतरी येणार येणार गं' या गाण्यावर सगळ्या जणींनी ठेका धरला. शिवाय स्मिताचे पति धिरेंद्र यांनीही डान्स केला. स्मिताच्या डोहाळे जेवणाचा हा गोड व्हिडीओ सोशल मिडीयावर चर्चेत आलाय. 

Recommended

Loading...
Share