पाहा Video : या गोड कपलचा रोमान्स वेधतोय सगळ्यांचं लक्ष

By  
on  

काही दिवसांपूर्वी अभिनेता सुयश टिळकने त्याच्या चाहत्यांसह सगळ्यांना गुड न्यूज दिली होती. ही गुड न्यूज होती त्याच्या साखरपुड्याची. अभिनेत्री आयुषी भावेसोबत साखरपुडा केल्याची बातमी सुयशने सोशल मिडीयावरुन दिली होती. आणि त्याच्या चाहत्यांना सुखद धक्का दिला. 

अभिनेत्री आयुषी ही एक उत्तम नृत्यांगना देखील आहे. डान्सिंग क्वीन या डान्स रिएलिटी कार्यक्रमातून तिच्या नृत्याची जादू पाहायला मिळाली होती. साखरपुड्याच्या बातमीनंतर सुयश आणि आयुषीची गोड जोडी मोठ्या प्रमाणात पसंत केली जात आहे. शिवाय सोशल मिडीयावरही या जोडीची चर्चा आहे.

सध्या हे गोड कपल त्यांचे रोमँटिक फोटो आणि व्हिडीओ सोशल मिडीयावर पोस्ट करताना दिसत आहेत. आयुषीने नुकताच एक गोड व्हिडीओ सोशल मिडीयावर शेयर केलाय. शिवाय सुयष-आयुषीच्या खास फोटोनेही सगळ्यांचं लक्ष वेधलय. तेव्हा ही जोडी लग्नबंधनात कधी अडकणार अशाही चर्चा सुरु आहेत. 

Recommended

Loading...
Share