By  
on  

प्रतिक्षा संपली ! ही अभिनेत्री साकारतेय शिव ठाकरेची 'शीलावती'

मराठी बिग बॉसच्या दुसऱ्या पर्वाचा विजेता शिव ठाकरे आता एका वेगळ्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. शिव त्याच्या चाहत्यांसाठी खास सरप्राईज घेऊन येत आहे. एका नव्या गाण्यासह शिव चाहत्यांच्या भेटीला येतोय. शीलावती हे नवं गाण्याच्या निमित्ताने शिवचा हटके अंदाज पाहायला मिळणार आहे. मुख्य म्हणजे या गाण्यात शिवसोबत कोणती अभिनेत्री झळकणार याकडे सगळ्यांचं लक्ष होतं. ही शीलावती नेमकी आहे तरी कोण असा प्रश्न पडला होता. 

मात्र आता प्रतिक्षा संपली आहे. शिव सोबत झळकणारी ती शीलावती आहे अभिनेत्री मीरा जगन्नाथ. या गाण्याच्या निमित्ताने शिव आणि मीरा पहिल्यांदाच एकत्र झळकणार आहेत. त्यामुळे आता या शीलावतीसोबतची शिवची केमिस्ट्री पाहणं औत्सुक्याचं ठरेल. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Shiv Thakare (@shivthakare9)

 

लवकरच या गाण्याचा टीझर प्रदर्शित होणार असून हे खास गाणं प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मीरा ही मॉडेल असून तिने विविध टेलिव्हिजन कार्यक्रम आणि वेब सिरीजमध्येही काम केलय. माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेतही ती झळकली होती. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive