अभिनेत्री मयुरी देशमुखच्या आयुष्यात मागील वर्षी दु:खाचा डोंगर कोसळला होता. मागील वर्षी जुलै महिन्यात मयुरीचा पती आशुतोषने आत्महत्या केली होती. आशुतोष काही काळापासून नैराश्येत असल्यामुळे त्याने आत्महत्या केल्याचं समोर आलं होतं.
आशुतोषच्या वाढदिवसानिमित्ताने त्याच्या आठवणीत मयुरीने सोशल मिडीयावर खास पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये तिने खास कविता लिहीली आहे. शिवाय पोस्टमध्ये एक व्हिडीओही पाहायला मिळतोय.
या व्हिडीओत मयुरीने आशुतोषसोबतचे खास क्षण शेयर केले आहेत. त्याच्यासोबतच्या आठवणी या फोटोंमध्ये पाहायला मिळत आहेत. आशुतोष देखील मनोरंजन विश्वात अभिनेता म्हणून काम करायचा. तर मयुरी देखील अभिनेत्री म्हणून मालिका, चित्रपट आणि नाटकांमध्ये काम करते.
'इमली' या हिंदी मालिकेतून मयुरी प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतेय.