By  
on  

पाहा Video : सोनाली कुलकर्णी आणि प्रार्थना बेहेरेचा Friends डायलॉगवर केलेला हा व्हिडीओ पाहिलात का ?

सोशल मिडीयावर फ्रेंड्स या प्रसिद्ध इंग्रजी मालिकेच्या डायलॉगवर व्हिडीओ केले जातात. अनेक सेलिब्रिटी मंडळीही या डायलॉगवर व्हिडीओ करताना दिसतात. सध्या इन्स्टाग्रावर रीलचा ट्रेंड आहे. डान्स, डायलॉग आणि विविध गोष्टींवर व्हिडीओ केले जातात. यात सेलिब्रिटी मंडळी हे ट्रेंडिंग व्हिडीओ मोठ्या प्रमाणात करताना दिसतात. असाच एक व्हिडीओ मराठी मनोरंजन विश्वातील खास मैत्रिणींना केलाय.

या मैत्रिणींची जोडी म्हणजे अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि प्रार्थना बेहेरे. सोनाली आणि प्रार्थनाची अनेक वर्षांची मैत्री आहे. त्यामुळे दोघींचे फोटो आणि व्हिडीओ अनेकदा पाहायला मिळाले आहेत. दोघींनी नुकताच केलेला व्हिडीओ चांगला लक्षवेधी ठरतोय.

'फ्रेंड्स' या प्रसिद्धा मालिकेतील लोकप्रिय डायलॉगवर दोघींनी हा व्हिडीओ केलाय. सोबत त्यांची मैत्रीण डॉ. भाग्यश्री गुप्ते देखील पाहायला मिळतेय. या व्हिडीओला सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात पसंत केलं जातय. म्हणूनच या व्हिडीओवर लाईक्सचा जणू वर्षाव करण्यात आलाय.  या व्हिडीओ हजारो लाईक्स आणि कमेंट्स मिळाले आहेत.

'मितवा' आणि 'ती एन्ड ती' या सिनेमातून सोनाली आणि प्रार्थनाने एकत्र काम केलय. ऑनस्क्रिन झळकणाऱ्या या अभिनेत्रींची ऑफस्क्रिन घट्ट मैत्री असल्याचं सोशल मिडीयावर अनेकदा पाहायला मिळतं.

Recommended

PeepingMoon Exclusive