तुझ्यात जीव रंगला ही मालिका आता बंद असली तरी या मालिकेने अनेक वर्षे प्रेक्षकांचं मनोरंजन केलं होतं. सुरुवातीपासून अगदी शेवटपर्यंत या मालिकेने चाहत्यांना खिळवून ठेवलं होतं. या मालिकेतील राणादा आणि अंजलीबाई यांची जोडी तर मोठ्या प्रमाणात पसंत केली गेली. राणादाच्या भूमिकेतील अभिनेता हार्दिक जोशी आणि अंजलीच्या भूमिकेतील अभिनेत्री अक्षया देवधर यांना प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम आणि प्रतिसाद मिळाला होता.
ही जोडी सध्या एकत्र झळकत नसली तरी नुकतच दोघं एकत्र पाहायला मिळाले आहेत. दोघांना एकत्र पाहुन प्रेक्षकांना आणि चाहत्यांनाही प्रश्न पडला असेल. मात्र कोणत्या एका मालिकेसाठी नाही तर दोघं एका फोटोशूट जाहिरातीसाठी एकत्र आले आहेत.
नुकतच हार्दिक आणि अक्षयाने खास जाहिरातीसाठी फोटोशूट केलय. यात दोघांचा हटके अंदाज आणि कधीही न पाहिलेला लुक पाहायला मिळतोय. दोघांच्या हटके लुकने लक्ष वेधून घेतलय. या फोटोशूटमध्ये अक्षयाने साडी नेसलीय तर हार्दिकने धोती कुर्ता असा इन्डो वेस्टर्न लुक केलाय.
या दोघांची केमिस्ट्री चांगली असल्याने फोटोशूटमध्येही दोघं उठून दिसत आहेत.