By  
on  

पाहा Photo : सई ताम्हणकरच्या या फोटोंवरुन तुमचीही नजर हटणार नाही

मराठीसह हिंदीतही वैविध्यपूर्ण भूमिका साकारणारी अभिनेत्री सई ताम्हणकरचे एकापेक्षा एक लुक्स सोशल मिडीयावर पाहायला मिळतात. सई तिच्या फोटोशुटेच विविध लुक सोशल मिडीयावर शेयर करते. या फोटोंना चाहत्यांची मोठ्या प्रमाणात पसंती असते.

वेस्टर्न आणि ट्रेडिशनल अशा दोन्ही लुकमध्ये सुंदर दिसणाऱ्या सईचे सुंदर फोटो तिच्या सोशल मिडीया अकाउंटवर पाहायला मिळतात. 

सईने नुकतेच तिचे काही ट्रेडिशनल लुक फोटो सोशल मिडीयावर शेयर केले आहेत. केसात माळलेला गजरा, मोठे झुमके, गुलाबी रंगाचा लेहेंगा असा सुंदर लुक यात पाहायला मिळतोय.

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या लोकप्रिय कार्यक्रमासाठी सई ही परिक्षकाच्या भूमिकेत दिसते. या कार्यक्रमासाठी सईचे विविध लुक पाहायला मिळतात. या कार्यक्रमाच्या निमित्तानेच सईने हा खास लुक केलाय.

नुकतच हिंदी सिनेमा 'मीमी' मधून सईची हटके भूमिका पाहायला मिळाली. या सिनेमातील तिच्या कामाचही कौतुक झालं. आगामी काळात 'कलरफुल', 'इंडिया लॉकडाऊन' या सिनेमांमधून सई प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive