By  
on  

'सिटी ऑफ ड्रिम्स 2' च्या सेटवरील हे ऑफस्क्रिन फोटो पाहिले का ? प्रियाने सेटवर अशी केली धमाल

'सिटी ऑफ ड्रिम्स 2' या वेबसिरीजला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. म्हणूनच या सिरीजच्या टीमने नुकतच या यशाचं सेलिब्रेशनही केलं. मात्र या सिरीजच्या चित्रीकरण दरम्यान सेटवर काय घडत होतं हे पाहणही औत्सुक्याचं ठरतय. कारण या सिरीजची मुख्य नायिका पौर्णिमा गायकवाडची भूमिका साकारणारी अभिनेत्री प्रिया बापटने सोशल मिडीयावर या सिरीजच्या चित्रीकरणा दरम्यानचे ऑफस्क्रिन फोटो शेयर केले आहेत.

या फोटोंमध्ये प्रियाची ऑफस्क्रिन मस्ती पाहायला मिळतेय.

या पोस्टमध्ये शेवटी एक खास व्हिडीओही पाहायला मिळतोय. ज्यात प्रिया प्रेन्गेंट दिसत असून डान्सही करतेय. या सिरीजमधील भूमिकेसाठी केलेले हे लुक आणि प्रियाची ही पोस्ट मोठ्या प्रमाणात पसंत केली जातेय.

या सिरीजमध्ये अभिनेत्री प्रिया बापटने मुख्यमंत्री पौर्णिमा गायकवाडची भूमिका साकारली आहे. जी वडिलांच्या आजारपणानंतर राजकारणात प्रवेश करण्याच्या प्रक्रियेत आपल्या भावाचा खून करुन नंतर स्वत: राजकारणात सक्रिय होते. यानंतर पुढे काय घडतं हे या सिरीजमध्ये पाहणं महत्त्वाचं ठरतय.

प्रियासह या सिरीजमध्ये अभिनेता अतुल कुलकर्णी, एजाज खान, सचिन पिळगांवकर, आदिनाथ कोठारे या कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत. 

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive