By  
on  

पाहा Photo : 'सैराट'च्या रिंकूमध्ये झाला इतका बदल, ओळखणही जातय कठीण

अभिनेत्री रिंकू राजगुरु सध्या विविध सिनेमा, वेबसिरीजच्या माध्यमातून वैविध्यपूर्ण भूमिका साकारताना दिसतेय. मराठीतच नाही तर हिंदीतही रिंकूने आता वेगळी ओळख निर्माण केलीय. 'सैराट' या सिनेमातून आर्ची म्हणून प्रसिद्ध झालेल्या रिंकू एक उत्तम अभिनेत्री म्हणून मनोरंजन विश्वात उंचच उंच झेप घेताना दिसतेय. यातच सोशल मिडीयावरही रिंकूचा बदललेला हटके अंदाज पाहायला मिळतोय.

'सैराट' सिनेमानंतर रिंकू राजगुरु अभिनेत्री म्हणून लोकप्रिय ठरली. सोशल मिडीयावरही तिचा मोठा चाहतावर्ग तयार झालाय. मराठीसह हिंदीतही उत्तम कामगिरी करणारी रिंकू तिच्या फिटनेस आणि स्टाईलकडेही लक्ष देताना दिसतेय. म्हणूनच तिच्या सोशल मिडीयावर तिचे हटके स्टनिंग फोटो सध्या पाहायला मिळतायत.

रिंकूने नुकतेच काही स्टाईलिश फोटो शेयर केले आहेत. या फोटोंमध्ये रिंकूचा शॉर्ट हेयर लुक पाहायला मिळतोय. शिवाय क्रॉप टॉप आणि श्रग लुकही पाहायला मिळतोय. रिंकूने स्वत:ला चांगलच फिट बनवलय. त्यामुळे रिंकूचा हा बदललेला अंदाजही चाहत्यांना थक्क करतोय. 

'200 हल्ला हो' या हिंदी सिनेमातून रिंकू सध्या प्रेक्षकांची मनं जिंकतेय. याशिवाय 'अनकही कहानिया' या हिंदी सिरीजमधूनही ती प्रेक्षकांच्या भेटीला येईल. आगामी काळात 'आठवा रंग प्रेमाचा', 'छूमंतर' या मराठी सिनेमांमधून रिंकू झळकणार आहे. याशिवाय अनेक हिंदी प्रोजेक्टी ती सातत्याने करतेय. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive