पाहा Photo : या आठवणी शेयर करत स्वप्नील जोशीने दिल्या गोकुळाष्टमीच्या शुभेच्छा

By  
on  

अभिनेता स्वप्नील जोशी म्हटलं की त्याने केलेलं एक काम कायम प्रेक्षकांच्या डोळ्यासमोर येतं. ते म्हणजे त्याने साकारलेला कृष्ण. कृष्णा या मालिकेतून स्वप्नीलने साकारलेला कृष्ण लोकप्रिय ठरला होता. स्वप्नील जोशीच्या या भूमिकेतून प्रेक्षकांच्या डोळ्यासमोर खराखुरा कृष्णच जणू समोर येत होता. या भूमिकेने स्वप्नील जोशीला प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. स्वप्नीलने उत्तर रामायण या मालिकेतून बालकलाकार म्हणून प्रवास सुरु केला होता. त्यात कृष्णा ही मालिका प्रचंड चर्चेत आली आणि स्वप्नीलच्या कामाचही कौतुक झालं होतं. कृष्ण म्हणून स्वप्नीलला मिळालेली ओळख ही आजही कायम आहे.

यातच गोकुळाष्टमीचा दिवस स्वप्नीलसाठी खास असतो. ज्या भूमिकेमुळे स्वप्नील सुरुवातीच्या काळात नावारुपाला आला ती भूमिका म्हणजे कृष्णाची. म्हणूनच गोकुळाष्टमीच्या निमित्ताने स्वप्नीलने या भूमिकेतील आठवणी फोटोरुपात शेयर केल्या आहेत. त्याने साकारलेल्या कृष्णाचे फोटो त्याने शेयर केलेत.

यासह चाहत्यांना गोकुळाष्टमीच्या शुभेच्छा त्याने दिल्यात. स्वप्नीलच्या या फोटोंवर लाईक्सचा वर्षाव झालाय.

Recommended

Loading...
Share