अभिनेता, मॉडेल मिलिंद सोमण हा फिटनेसच्या बाबतीत किती सतर्क असतो हे अनेकदा पाहायला मिळालय. आयरन मॅन म्हणून ओळख असलेल्या मिलिंदचे असंख्य चाहते आहेत. या वयातही तरुणांना लाजवेल असा फिटनेस असलेल्या मिलिंदवरच सिटी स्कॅन करण्याची वेळ आली.
मिलिंद सोमणने सोशल मिडीयावर सिटी स्कॅन करतानाचा फोटो शेयर केलाय. हा फोटो पाहुनच सगळ्यांना धक्का बसला. मिलिंदचा फोटो पाहुन चाहत्यांना मात्र चिंता वाटू लागली. मात्र कॅप्शन वाचून त्याचं नेमकं कारण समोर आलं. हे सिटी स्कॅन मिलिंदने का केल याचं कारण त्याने कॅप्शनमध्ये लिहीलय.
ब्लॉकेज आणि रेग्युलर चेकअपसाठी मिलिंद सोमणने हा सिटी स्कॅन चेकअप केलं असल्याचं त्याने या पोस्टमध्ये म्हटलय. शिवाय ही सिटी स्कॅन चाचणी नॉर्मल म्हणजेच प्रमाणानुसार आल्याचं त्याने सांगितलय. मिलिंद या पोस्टमध्ये पुढे म्हणतो की, "दररोजच्या अन्न, व्यायाम, झोप आणि ताण व्यवस्थापन यांच्याविषयी चांगल्या सवयी तुम्हाला स्क्रिनींग सामान्य असल्याचं दाखवण्यात मदत करतात, मग तुमचे वय काहीही असो."