पाहा Video : सुयश आणि आयुषीच्या साखरपुड्याचा हा गोड व्हिडीओ एकदा पाहाच

By  
on  

अभिनेता सुयश टिळक आणि अभिनेत्री आयुषी भावे यांच्या साखरपुड्यानंतर हे गोड कपल सोशल मिडीयावरही चर्चेत आलय. यावर्षी दोघांनी त्यांच्या नात्याचा खुलासा सगळ्यांसमोर केला आणि थेट साखरपुड्याचे फोटो सोशल मिडीयावर शेयर केले. त्यानंतर दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव झाला. 

नुकताच दोघांच्या साखरपुड्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर चर्चेत आलाय. आयुषीने हा गोड व्हिडीओ सोशल मिडीयावर शेयर करत सुयशसाठीच्या भावना व्यक्त केल्या आहेत. ती लिहीते की, "आयुष्यातील सर्वोत्तम गोष्टी तुझ्यासोबत चांगल्या असतात"

आयुषीने नुकत्याच शेयर केलेल्या व्हिडीओत साखरपुड्याचे काही खास क्षण चित्रीत केलेल आहेत. पारंपारिक वेशभुषेत दोघं छान सजलेले, नटलेले दिसत आहेत. या कपलचे आणखी काही गोड फोटो त्यांच्या सोशल मिडीया पोस्टवर पाहायला मिळतायत.

Recommended

Loading...
Share