By  
on  

पाहा Photos : शिव ठाकरेच्या नव्या फोटोशूटने वेधलं चाहत्यांचं लक्ष

बिग बॉस मराठीचं लवकरच तिसर पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येणारेय. याआधी झालेलं पहिलं आणि दुसरं पर्वही चांगलच चर्चेत आलं होतं. अभिनेत्री मेघा धाडे ही पहिल्या पर्वाची विजेती ठरली तर शिव ठाकरे हा दुसऱ्या सिझनचा विजेता ठरला. 

बिग बॉस मराठीची ट्रॉफी जिंकल्यानंतर शिवचा मोठा चाहतावर्ग तयार झाला. सोशल मिडीयावर तर शिवचे असंख्य चाहते आहेत. या चाहत्यांसाठी शिव विविध फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करताना दिसतो. बिग बॉस मराठी या कार्यक्रमातून एक उत्तम माणूस म्हणूनही शिवची ओळख निर्माण झाली. त्यामुळे चाहते त्याच्यावर भरभरुन प्रेम करतात.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Shiv Thakare (@shivthakare9)

 

शिवने नुकतच खास फोटोशूट केलय. या फोटोशूटमध्ये शिवचा स्टनिंग लुक पाहायला मिळतोय. रंगीबेरंगी आउटफीटमध्ये शिवचा हटके अंदाज पाहायला मिळतोय.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Shiv Thakare (@shivthakare9)

Author

Recommended

PeepingMoon Exclusive