गणेशोत्सव काही दिवसांवरच येऊन ठेपलाय, त्यामुळे सगळीकडे आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतय. यातच बाप्पा घरी येणार म्हणून गणेशभक्तांची लगबग सुरु झालीय. यात गणपतीसाठीची सजावट, गोडधोड पदार्थ बनवण्याचा उत्साह काही औरच असतो. प्रसिद्ध दिग्दर्शक रवी जाधव यांच्याकडेही दीड दिवसांसाठी बाप्पाचे आगमन होते. मात्र त्यांच्या गणपतीच्या मूर्तीचं एक खास वैशिष्ट्य आहे.
गेल्या काही वर्षांपासून रवी जाधव यांच्या घरी इकोफ्रेेंडली गणपती मूर्तीची पूजा केली जाते. अनेक वर्षांपासून रवी जाधव आणि कुटुंब घरातच बाप्पाची मूर्ती साकारून त्याची मनोभावे पूजा करून घरातच विसर्जन केले जाते.
यंदाही रवी यांनी घरातच इको फ्रेंडली मूर्ती तयार केली आहे. बाप्पाच्या या सुंदर मूर्तीवर लाल रंग चढवण्यात आलाय. या मूर्तीसोबतचा फोटो रवी यांनी सोशल मिडीयावर शेयर केला आहे. हा आनंद व्यक्त करत रवी लिहीतात की, "वर्षातला सर्वात मोठा आनंद"