By  
on  

परी राणीच्या विश्वात घेऊन जाणार, ‘परी हूं मे’

परी म्हटलं की, आकाशातली एक सुंदरी आपल्यासाठी छान-छान गोष्टी घेऊन येते असं, लहानपणापासून आपल्या मनावर बिंबवलं जातं. लहान-मुलांसाठी परीकथा म्हणजे एक पर्वणीच असते.परी राणीची एक हटके गोष्ट लवकरच सिल्व्हर स्क्रिनवर झळकणार आहे.

टीव्ही म्हणजे आज लहान मुलांचं एक विश्व आहे. शाळा, अभ्यास, खेळ यांच्यासोबतच टीव्हालासुध्दा ते महत्त्वाचं स्थान देतात. अनेकदा टीव्हीच्या विश्वात लहान मुलं तहान-भूक हरपून रममाण होऊन जातात. लहान मुलांना मध्यवर्ती ठेऊन अनेक मालिका टीआरपीचं गणित मांडतात. हाच विषय लेखिका इरावती कर्णिक यांनी ‘वेगे वेगे धावू’ या एकांकिद्वारे रंगमंचावर आणला होता. याच एकांकिकेवर ‘परी हूं में’ हा आगामी सिनेमा आधारित आहे.

रोहित शिलवंत यांनी या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. स्वरूप रिक्रीएशन्स अँड मिडिया प्रा. लि. प्रस्तुत आणि योगायतन फिल्मस निर्मित ‘परी हूँ मैं’ या सिनेमाच्या निर्मितीची डॉ. राजेंद्र प्रताप सिंग आणि शिला सिंग यांनी सांभाळली आहे.

अभिनेते नंदू माधव, देविका दफ्तरदार, श्रुती निगडे, फ्लोरा सैनी यांच्या सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.‘परी हूँ मैं’ची कथा मच्छिंद्र बुगडे, रोहित दास शिलवंत आणि संकेत माने यांनी लिहीली असून संवाद योगेश मार्कंडे यांचे आहेत. अभिषेक खणकर आणि सचिन पाठक यांच्या गीतांना संगीतकार समीर सप्तीसकर यांनी संगीतबद्ध केले असून शंकर महादेवन, अमृता फडणवीस, जिया वाडकर आणि मंदार पिलवळकर यांनी आपल्या सुमधूर वाजात ते स्वरबध्द केले आहेत.

‘परी हूँ मैं’ हा सिनेमा येत्या 7 सप्टेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.

 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive