पाहा Photos : जांभळ्या रंगाच्या शालूत खुललं श्रुती मराठेचं सौंदर्य

By  
on  

अभिनेत्री श्रुती मराठेचे सोशल मिडीयावर असंख्य चाहते आहेत. तिचं सौंदर्य आणि अदा पाहून चाहते तिच्या पोस्टवर लाईक्सचा वर्षाव करतात. अभिनय आणि नृत्यकौशल्यासोबतच श्रुतीचं सौंदर्यही कायम लक्षवेधी ठरतं. वेस्टर्नसह पारंपारिक वेशभुषेतही श्रुतीचं सौंदर्य खुलून दिसतं.

श्रुतीने सोशल मिडीयावर नुकतेच काही खास फोटो शेयर केले आहेत.

या फोटोंमध्ये श्रुतीने जांभळ्या रंगाचा शालू परिधान केलाय. साडीतील श्रुतीच्या सुंदर अदा खास लक्ष वेधून घेत आहेत. 

सोशल मिडीयावर श्रुतीच्या या फोटोंना मोठ्या प्रमाणात लाईक्स मिळाले असून चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. या साडीवर सोनेरी रंगाचा ब्लाउज, हातात कडं, कानातले असा हा सुंदर लुक पाहायला मिळतोय.

Recommended

Loading...
Share