सुयश टिळक आणि आयुषी भावेचं केळवण, लवकरच बांधणार लगीनगाठ

By  
on  

अभिनेता सुयश टिळक आणि आयुषी भावे ही जोडी लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. त्यामुळे सध्या त्यांच्या लग्नाआधीच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे. सध्या दोघांच्या केळवणाचे कार्यक्रम सुरु आहेत. नुकतच दोघांचं केळवण पार पडलं. 

यावेळी आयुषीने साडी नेसली होती तर सुयशने निळ्या रंगाचा कुर्ता परिधान केला होता.

यावेळी अभिनेत्री हर्षदा खानविलकर आणि इतर कलाकारांनी मिळून या केळवणाचे आयोजन केले होते. यावेळी सुयश,आयुषी आणि हर्षदा खानविलकर यांच्यासह अभिनेता अभिजीत केळकर, संग्राम समळे हे कलाकारही उपस्थित होते.

यावेळी सुयश आणि आयुषीसाठी केळवणाचा छान बेत करण्यात आला होता. काही महिन्यांपूर्वी सुयश आणि आयुषीने साखरपुडा केला होता. त्यानंतर सोशल मिडीयावर पोस्ट करून साखरपुड्याची आनंदाची बातमी दिली होती. शिवया दोघांच्या नात्याचा खुलासा सोशल मिडीयावर केला. लवकरच दोघं विवाहबंधनात अडकणार आहेत. 

Recommended

Loading...
Share