By  
on  

पाहा Video : 'झिम्मा'वर थिरकणार अवघा महाराष्ट्र, “खेळू झिम्मा गं.…” शीर्षक गीत प्रदर्शित

'झिम्मा' चित्रपटाचा टिझर प्रदर्शित झाला आणि या चित्रपटाविषयची उत्सुकता प्रचंड वाढली. 'झिम्मा' कधी चित्रपटगृहात येतोय, याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत असतानाच आता या चित्रपटाचे शीर्षक गीत प्रदर्शित झालय.  “खेळू झिम्मा गं.…” असे या गाण्याचे बोल आहेत.

अमितराज यांनी या धमाल गाण्याला संगीत दिले असून वैशाली सामंत, मुग्धा कऱ्हाडे, आरती केळकर, सुहास जोशी यांनी हे गाणे गायले आहे. 'चलचित्र कंपनी' प्रस्तुत 'अमेय विनोद खोपकर एंटरटेनमेंट' आणि 'क्रेझी फ्यू फिल्म्स' निर्मित 'झिम्मा' चित्रपट 19 नोव्हेंबरला सर्व चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होत आहे. 

हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा’ हा  लॉकडाऊननंतर चित्रपटगृहात प्रदर्शित होणारा पहिला मराठी चित्रपट आहे. विविध वयाच्या आणि वेगवेगळी पार्श्वभूमी असलेल्या स्त्रिया काही काळ जबाबदाऱ्या बाजूला ठेवत मनमुराद जगण्यासाठी इंग्लंडला जातात आणि मग काय धम्माल होते, हे लवकरच प्रेक्षकांना ‘झिम्मा’मधून पाहायला मिळणार आहे. सिद्धार्थ चांदेकर, निर्मिती सावंत, सुहास जोशी, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सोनाली कुलकर्णी , सायली संजीव, मृण्मयी गोडबोले यांच्या प्रमुख भूमिका आहेत. सिनेसृष्टीतील सात वेगळ्या धाटणीच्या अभिनेत्री एकाच चित्रपटात पाहायला मिळणे, ही प्रेक्षकांसाठी खरंच पर्वणी असेल.  या चित्रपटाचे लेखन इरावती कर्णिक यांनी केले असून छायाचित्रीकरण संजय मेमाणे यांनी केले आहे. क्षिती जोग यांच्यासोबत स्वाती खोपकर, अजिंक्य ढमाळ, विराज गवस, उर्फी काझमी, सनी शाह यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive