'पांडू' या आगामी चित्रपटात विनोदी अभिनेते म्हणून ओळख असलेले भाऊ कदम आणि कुशल बद्रिके एकत्र झळकत आहेत. विजू माने यांनी या चित्रपटाचं लेखन, दिग्दर्शन केलय. येत्या 3 डिंसेबरला प्रदर्शित होणाऱ्या सिनेमातील आणखी एक महत्त्वाचं पात्र आता समोर आलय. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी देखील या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात सोनाली ऊषा हे पात्र साकारतेय. एवढच नाही तर सोनाली आणि भाऊ कदम यांचा रोमान्स पाहायला मिळणार आहे.
नुकतच या चित्रपटातील नवीन गाणं प्रदर्शित झालय. या गाण्यात सोनाली आणि भाऊची धमाल केमिस्ट्री पाहायला मिळतेय. "बुरुम बुरुम" असे या गाण्याचे बोल आहेत. सोनाली आणि भाऊची डान्स-मस्ती या गाण्यात पाहायला मिळतेय.
गायक अवधूत गुप्ते आणि गायिका वैशाली सामंत यांना हे गाणं गायलय. सोशल मिडीयावर या गाण्याची जबरदस्त चर्चा आहे. पांडू आणि ऊषाची ही जोडी मोठ्या प्रमाणात पसंत केली जातेय. सोशल मिडीयावर सोनालीने या गाण्याविषयीची पोस्ट शेयर केलीय.
ती लिहीते की, "‘उषा’ आणि ‘पांडूची’ बाईकवरनं टूर ‘बुरुम बुरुम’ म्हणत निघायचं का भुर्र "