श्रीदेवींची कन्या जान्हवी कपूरच्या बॉलिवूडमधील ‘धडक’ एन्ट्रीनंतर आता आणखी एक स्टार किड लवकरच आपल्याला पाहायला मिळणार असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत. बॉलिवूडचा किंग खान शाहरुखची लाडकी लेक सुहाना खानने नुकताच वोग मॅगझीन इंडियाच्या कव्हरपेजवर झळकण्याचा मान पटकावला आहे. सुहाना सध्या फक्त 18 वर्षांची आहे आणि या मॅगझिन कव्हरवरील तिच्या फोटो शूटवरुन तिचा बोल्ड लूक समोर येत आहे.
https://twitter.com/iamsrk/status/1024362689341140992
किंग खानच्या हस्तेच वोग ब्युटी अवॉर्ड्स 30 जुलै 2018 दरम्यान हे कव्हरपेज लॉन्च करण्यात आले. शाहरुखनेसुध्दा मुलीचे कौतुक करत एक ट्विटसुध्दा केले आहे. सुहाना तुला खुप सा-या शुभेच्छा आणि प्रेम असं म्हटलं आहे.
https://twitter.com/Srishtea_/status/1024371085683261440
पण सुहानाचं एकीकडे कौतुकही होतंय तर दुसरीकडे नेटिझन्सकडून याबाबत संताप व्यक्त करण्यात आला आहे. फक्त सुपरस्टार शाहरुखची मुलगी असल्याने सुहानाला हा मान मिळाला असल्याचे बोलले जात आहे, तर कोण म्हणतंय सुहानाचं काहीच कर्तुत्व नसताना फक्त घराणेशाहीमुळे तिला वोगच्या कव्हरपेजवर घेण्यात आले आहे. तसंच वोगची पातळी दिवसेंदिवस खालावत चालली आहे, का असे ताशेरेसुध्दा ओढले जात आहेत. एकूणच बॉविवूडकरांच्या यावर काय प्रतिक्रिया येतील हे पाहणंसुध्दा उत्कंठावर्धक ठरेल.