By  
on  

ही प्रसिद्ध गायिका अडकली विवाहबंधनात, गळ्यातील फोटोंच्या हारनी वेधलं लक्ष

प्रसिद्ध गायिका शाल्मली खोलगडेने 22 नोव्हेंबर रोजी मुंबईत लगीनगाठ बांधली आहे. साउंड इंडिनियर फरहान शेखसोबत ती लग्नबंधनात अडकली आहे. ही जोडी गेल्या सहा वर्षांपासून एकमेकांना डेट करत असल्याचं कळतय. 1 डिसेंबर रोजी मुंबईत नातेवाईक आणि मित्रपरिवारासोबत दोघांचा रिसेप्शन सोहळा थाटात पार पडणार आहे.

मात्र दोघांनी विवाहसोहळा मात्र खाजगी स्वरुपात केल्याचं नुकत्याच समोर आलेल्या फोटोंमधून पाहायला मिळतय. नोंदणीकृत विवाह करण्याची दोघांची इच्छा होती मात्र घरच्या घरी काही विधी करून त्यांनी हा लग्नसोहळा पार पाडला. याचदिवशी दोघांनी साखरपुडा देखील केला आहे.

अतिशय साध्या पद्धतिने हा विवाहसोहळा पार पडला आहे. मात्र या सगळ्यात सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं ते या दोघांच्या गळ्यातील हारने. फुलांसोबत या हारमध्ये दोघांचे फोटो गुंफलेले होते. ज्याने सगळ्यांचं लक्ष वेधलय.

शाल्मलीने अनेक प्रसिद्ध हिंदी आणि मराठी गाण्यांसाठी आवाज दिलाय. शिवाय अनेक रिएलिटी शोसाठी ती परिक्षक म्हणूनही दिसलीय. याशिवाय शाल्मली ही म्युझिक कम्पोझर आणि गीतकार म्हणूनही काम करते. 

सोशल मिडीयावर शाल्मलीच्या लग्नाचे फोटो चर्चेत आले आहेत. तिच्या चाहत्यांनी देखील तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive