By  
on  

'बॉम्बे बेगम्स'साठी अमृता सुभाषला मिळाला तिचा पहिला आंतरराष्ट्रीय पुरस्कार

'बॉम्बे बेगम्स' या सिरीजमधील भूमिकेसाठी अभिनेत्री अमृता सुभाषचं सर्वत्र कौतुक झालं होतं. या चित्रपटात अमृताने बार डान्सरची भूमिका साकारली होती. आणि याच भूमिकेसाठी अमृतावर पुन्हा एकदा कौतुकाचा वर्षाव होतोय. नुकतीच 'एशियन अकॅडमी क्रिएटीव्ह अवॉर्ड्स'च्या विजेत्यांची घोषणा ऑनलाईन करण्यात आली. यावेळी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीची नामांकनामध्ये बॉम्बे बेगम्ससाठी अमृता सुभाषचं नाव यादीत होतं. एवढच नाही तर नामांकनानंतर आता अमृताने हा पुरस्कारही पटकावला आहे. सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री म्हणून अमृताला 'एशियन अकॅडमी क्रिएटीव्ह अवॉर्ड' घोषीत झालाय. अमृताने ही आनंदाची बातमी सोशल मिडीयावर जाहीर केली आहे. 

 

या अवॉर्ड सोहळ्यातील विजेत्यांच्या घोषणेचा ऑनलाईन क्षण अमृताने सोशल मिडीयावर शेयर केलाय. शिवाय हा अमृताच्या करियरमधील पहिला आंतरराष्ट्रीय पुरस्कार असल्याचही तिने नमूद केलय. या पोस्टमध्ये ती लिहीते की, "पहिला आंतरराष्ट्रीय पुरस्कार. माझ्या बॅाम्बे बेगम्सच्या टीमचे आभार. या एशियन पुरस्कारासाठी भारताचं प्रतिनिधित्व करणं हा भारावून टाकणारा अनुभव होता.."

याशिवाय 'अजीब दास्तान्स' या सिनेमासाठी अभिनेत्री कोकंणा सेन शर्माला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार घोषीत करण्यात आला. तर 'मिर्झापूर 2' ला सर्वोत्कृष्ट मूळ कार्यक्रमाचा पुरस्कार जाहीर झाला. तर सर्वोत्कृष्ट पटकथा आणि ध्वनीमुद्रणासाठी 'पग्लेट' सिनेमाला दोन पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive